संपर्काची माहिती

आमच्याशी संपर्क साधा

Phone:

+91 885504738

+91 885504738

Email:

Info@domain.com

Info@domain.com

Address :

Patricia C. 4401 Waldeck

Phone:

+91 885504738

+91 885504738

Email:

Info@domain.com

Info@domain.com

Address :

Patricia C. 4401 Waldeck

महत्वाची माहिती

श्री विश्वकर्मा स्वयंसेवक बद्दल

सन्माननीय समाज बांधव श्री विश्वकर्मा स्वयंसेवक म्हणून आम्ही काही समविचारी मित्र समाज बांधव 2015 पासून समाजात काम करत आहोत आपल्या समाजात वावरताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजात शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग व्यवसाय, पर्यावरण, सांस्कृतिक कला क्रीडा, खेळ, विवाह, सामुदायिक विवाह, समाज एकत्रित करने, या सर्व विषयावर आम्ही काम करत आहोत, समाज मार्गदर्शन करणे, समाज प्रबोधन करणे समाजाची गरज असेल त्या त्या वेळेस समाजासाठी मदत करणे तसेच समाजातील विवाह जमवणे, सामुदायिक विवाह करणे, प्रोत्साहन देणे, समाजातील विधवा विधुर विकलांग अंध अपंग जेष्ठ नागरिक यांच्या विवाहासाठी हि मदत करणे, सरकारच्या विविध सवलती उद्योग विषयक सवलती रोजगार विषयक संस्थेची शैक्षणिक विषय सवलती सरकारी दाखले मिळवून देण्यास मदत करणे, श्री विश्वकर्मा स्वयंसेवक ग्रुपच्या वतीने श्री विश्वकर्मा शिष्यवृत्ती उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे या मागील सर्व उपक्रमां ग्रुपच्या वतीने आपल्या सहकार्याने कोरोना काळातही आपण अन्नधान्य किट शिधा वाटप जवळजवळ 400 गरीब गरजू कुटुंबांना केलेले आहे. ग्रुपच्या वतीने समाजातील गरजू रुग्णांना अर्थसहाय्य, औषध उपचार, गव्हर्मेंट पॉलिसी अंतर्गत उपचार, योग्य हॉस्पिटल रेफर करून मदत केली जाते. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ही मदत केली जाते गेल्या दोन वर्षात कोल्हापूर सातारा सांगली व कोकण परिसरातील आलेल्या पूर परिस्थितीत तेथील समाजबांधवांना ग्रुपच्या वतीने मदत पोहोचवली आहे. आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या भावनेने समाज रून म्हणून आपण समाजाला आपल्या परीने होईल ती मदत करायचा प्रयत्न करत असतो समाजात मदत करताना ग्रुप सदस्य प्रथम स्वता कॉन्ट्रीब्यूट करतात व नंतर समाजातील दानशूर व जाणकार समाज बांधवांची मदत योग्य गरजूकडे पोहच करतात. श्री विश्वकर्मा शिष्यवृत्ती हा उपक्रम समाजातील गरीब गरजू मुलांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये व त्यांना वह्या पुस्तके शैक्षणिक साहित्य शाळेचा ड्रेस तसेच शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठीच श्री विश्वकर्मा शिष्यवृत्ती या नावाने ही समाजाची मदत म्हणून केली जाते. धन्यवाद